प्रस्तावना

महाराष्ट्रात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीवर कायम स्वरूपी उपाय योजना करण्याच्या उद्देशाने जलसंधारणाच्या योजना राबविणेसाठी शासनाने ० ते २५० (हे.) पर्यंत सिंचन क्षमता असलेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पाचे बांधकाम व देखभाल व व्यवस्थानाचे काम ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत करण्याचा निर्णय शासन पाटबंधारे विभाग संकीर्ण १०९२ (२८३/९२) आ (क्षेप्र) दिं. ३० सप्टेंबर १९९२ अन्वये घेण्यात आला. शासन निर्णय दिनांक ३१/०५/२०१७ अन्वये मृद व जलसंधारण विभागाची नव्याने स्थापना करण्यात आलेली आहे. मृद व जलसंधारणच्या कार्यक्षेत्रात २५० (हे.) पेक्षा जास्त वाढवून ६०० हेक्टर इतके करण्यात आलेले आहे.

या मंडळांतर्गत ० ते १०० (हे.) ची कामे जिल्हापरिषदे मार्फत राबविण्यात येतात. जिल्हा परिषदांना तांत्रिक मार्गदर्शन करणे व १ कोटी पेक्षा जास्त किंमत असलेल्या अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देण्याचे काम लघु सिंचन (जलसंधारण) मंडळामार्फत करण्यात येते. या मंडळांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, वळवणी बंधारे, काँक्रीट बंधारे, पक्के बंधारे, भूमीगत बंधारे, साठवण बंधारे व गांव तलाव इं. कामे करण्यात येतात.

अ.क्र. विभागाचे नांव मुख्यालय कार्यक्षेत्र
अ) जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे ठाणे ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील १०१ ते ६०० हे. सिंचन क्षमतेच्या योजनांची बांधकामे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार व वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार ० ते १०० हे. मधील कामे.

ब) जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग,रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०१ ते ६०० हे. सिंचन क्षमतेच्या योजनांची बांधकामे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार व वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार ० ते १०० हे. मधील कामे.

क) जिल्हा जलसंधारण  अधिकारी, जिल्हा परिषद, (ल. पा.) ठाणे, पालघर, रायगड-अलिबाग, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
जिल्हा परिषदेकडील योजनांना तांत्रिक मार्गदर्शन व १ कोटी किंमतीच्या पुढील अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे.

अ) जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे

या विभागाचे कार्यक्षेत्र ठाणे, पालघर व रायगड जिल्हा असून विभागाचे कार्यक्षेत्रात ७ उपविभाग आहेत. ठाणे जिल्ह्यात २, बदलापूर, शहापूर आणि पालघर जिल्ह्यात २ पालघर,सूर्यानगर व रायगड जिल्ह्यात ३ उपविभाग कर्जत, कोलाड व माणगांव येथे कार्यरत आहेत

.ब) जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग,रत्नागिरी
विभागाचे कार्यक्षेत्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा असून विभागाचे कार्यक्षेत्रात ५ उपविभाग आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ३, लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग दापोली, चिपळूण , लांजा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग फोंडाघाट व आंबडपाल येथे कार्यरत आहेत.

क) महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद
राज्यात सामाजिक वनीकरण पाटबंधारे प्रकल्प यासह, पाणलोट क्षेत्राचे प्रचालन, प्रवर्तन व शीघ्र-विकास व नियमन करण्याकरिता सन २००० चा अध्यादेश क्र. १३, दि. २२. ८. २००० अन्वये महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाची स्थापना करण्यात आली. सदर महामंडळाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.