प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना - पाणलोट विकास घटक २.०

  • केंद्रीय भूसंसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - पाणलोट विकास घटक २.० ही योजना राज्यात राबविण्यासाठी दि.३० डिसेंबर २०२१ रोजी मार्गदर्शक सूचनानुसार निर्गमित केल्या आहेत. या योजनेकरिता केंद्र व राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण ६०:४० आहे.
  • प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० राज्यात २०२१-२२ पासून राबविली जात आहे.

योजनेचा मुख्य उद्देश:-

१) राज्यातील पडीक जमिनीचा विकास करून ग्रामीण जनतेला रोजगार, उपजिवीका, आर्थिकस्तर उंचावणे व त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. २) मृद संधारणाची कामे करून जमिनीची उत्पादकता वाढविणे.
  • योजनेसाठी अंमलबजावणी करणारी यंत्रणा :- जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग (राज्यस्तर).
  • सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध स्तरावर समित्या स्थापन करण्यात आले असून जिल्हा स्तरावर जिल्हा जलसंधारण अधिकारी व तालुका स्तरावर उपविभागीय जलसंधारण अधिकारी सदस्य सचिव आहेत.
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० योजनेतर्गत पाणलोट घटक महत्वाचा असून माथा ते पायथा या तत्त्वावर कामे हाती घेण्यात येतात.
  • या प्रादेशिक कार्यालयातील विभागीय कार्यालयांतर्गत जिल्हा जलसंधारण अधिकारी कळवा-ठाणे कार्यालयाकडून ठाणे व पालघर जिल्ह्यात, जिल्हा जलसंधारण अधिकारी रायगड कार्यालयाकडून रायगड जिल्ह्यात आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी रत्नागिरी कार्यालयाकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.oयोजना राबविण्यात येत आहे.
  • नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची (NRM) कामे प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० च्या ४७% टक्के निधीतून करावयाचे आहे.
  • प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० योजने अंतर्गत ठाणे विभागांतर्गत एकूण 09प्रकल्पकार्यान्वीनयंत्रणाअसुन अनुक्रमे ठाणे जिल्ह्यात ०१ व पालघर जिल्ह्यात ०८,रायगड विभागांतर्गत एकुण १० प्रकल्प कार्यान्वीन यंत्रणा व रत्नागिरी विभागांतर्गत एकूण १८ प्रकल्प कार्यान्वीन यंत्रणा असुन रत्नागिरी जिल्ह्यात ९ व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ०९प्रकल्प कार्यान्वीन यंत्रणेचा समावेश आहे.
अ.क्र. तारीख शीर्षक डाउनलोड
२७ एप्रिल २०२२ केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंमलबजावणी करिता केंद्र शासनाच्या मार्गदशगक सूचना २०२१ नुसार राज्यस्तरीय मान्यता समिती (SLSC) व नोडल यंत्रणा (SLNA) गठीत करणेबाबत. डाउनलोड
२७ एप्रिल २०२२ केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंमलबजावणी करिता केंद्र शासनाच्या मार्गदशगक सूचना २०२१ नुसार राज्यस्तरीय मान्यता समिती (SLTC) व जिल्हा पाणलोट कक्ष व माहिती कें द्र (WCDC) गठीत करणेबाबत. डाउनलोड
०६ जुलै २०२२ प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना - पाणलोट विकास घटक २.० (PMKSY 2.0) अंतर्गत पाणलोट समिती (WC) स्थापन करणेबाबत. डाउनलोड
GUIDELINES FOR NEW GENERATION WATERSHED DEVELOPMENT PROJECTS (WDC-PMKSY 2.0) डाउनलोड

पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 – नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन
अ. क्रं. जिल्ह्याचे नाव एकूण प्रकल्प संख्या प्रकल्प मूल्य रक्कम (रु. लाख) आज पर्यंत झालेला खर्च
(रु. लाखात)
खर्चाची टक्केवारी (%)
एकूण NRM (47%)
1 पालघर 8 7302.24 3432.05 2017.31 58.78
2 रायगड 10 11582.95 5443.99 3338.31 61.32
3 रत्नागिरी 9 8985.93 4223.39 1945.25 46.06
4 सिंधुदुर्ग 9 9739.68 4577.65 3068.11 67.02
5 ठाणे 1 763.69 358.93 233.02 64.92
एकूण 37 38374.49 18036.01 10602 58.78

उत्पादन पद्धती घटकांतर्गत वैयक्तिक लाभार्थी अर्ज व खर्चाचा तपशील
अ. क्रं. जिल्ह्याचे नाव लक्षांक रक्कम
(रु. लक्ष)
एकूण अर्ज झालेला खर्च
(रु. लक्ष)
खर्चाची
टक्केवारी
प्राप्त मंजूर रद्द प्रलंबित
1 पालघर 715.61 2225 1940 269 16 409.09 57.17
2 रायगड 1135.19 3007 3007 0 0 1135.19 100
3 रत्नागिरी 880.67 2121 2081 40 0 622.72 70.71
4 सिंधुदुर्ग 954.54 2494 2494 0 0 954.54 100
5 ठाणे 74.85 316 306 5 5 60.25 80.49
TOTAL 3760.86 10163 9828 314 21 3181.79 84.6