नदी पुर्नजीवन कार्यक्रम

नदी पुर्नजीवन कार्यक्रमा अंतर्गत कोकण विभागात ठाणे जिल्ह्यात कणकवीरा, रायगड जिल्ह्यात गांधारी, रत्नागिरी जिल्ह्या मधील जगबुडी, अर्जुना व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जानवली या नदयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

कणकवीरा नदी : जिल्हा ठाणे

कणकवीरा नदी हि ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी खोऱ्यातील काळू नदीची उपनदी आहे. नदीची लांबी सुमारे १७.०० कि. मी. इतकी आहे. पाणलोट क्षेत्र सर्वसाधारणपणे ३५ ते ४० चौ. कि. मी. आहे. नदी पुर्नजीवन अंतर्गत कृषी विभाग, जलसंधारण विभाग व जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग यांचे एकत्रित सहभागाने Area Treatment व Drainage Treatment कामे प्रस्तावित आहेत.

गांधारी नदी : जिल्हा रायगड

गांधारी नदी पुनाड तर्फे नाते येथील डोंगरामध्ये उगम पावते गांधारी नदीच्या पात्राची रुंदी ५० मी. ते ९० मी. इतकी असून लांबी अंदाजे २५ कि. मी. आहे. या नदीत पुर्नजीवन अंतर्गत प्राथमिक टप्प्यात महाड तालुक्यात १० ठिकाणी कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, काळवा, ठाणे यांचे मार्फत सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.

अर्जुना नदी : जिल्हा रत्नागिरी

अर्जुना नदी सह्याद्रीच्या मजे पांगारी खुर्द येथे उगम पावते. उगम स्थानी जवळपास ३५०० कि. मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो. नदीची लांबी सुमारे ६० कि. मी. असून पाणलोट क्षेत्र ७०७.९६ चौ. कि. मी. आहे. नदी पात्राची उगमाजवळ १८ ते २० मी. रुंदी असून ४५ ते ५० मी. रुंदी संगमाजवळ आहे. नदी पुर्नजीवन अंतर्गत प्राथमिक टप्प्यात ६ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे सर्वेक्षण कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, रत्नागिरी मार्फत करण्यात आलेले असून सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर निधी उपलब्धे नुसार काम करण्याचे नियोजन आहे.

जगबुडी नदी : जिल्हा रत्नागिरी

जगबुडी नदी मोजे वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते. या नदीस जांबू उपनदी येऊन मिळते. नदीची लांबी ४५ किमी रुंदी असून संगमाजवळ १६५ चौ. कि. मी. इतकी आहे. नदी पुर्नजीवन अंतर्गत प्राथमिक टप्प्यात खेड तालुक्यात ४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. सविस्तर अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, रत्नागिरी मार्फत करण्यात येत आहे.

जानवली नदी : जिल्हा सिंधुदुर्ग

जानवली नदी दाजीपूर या ठिकाणाजवळ सह्याद्रीमध्ये उगम पावते व गड नदीला वरवडे ता. कणकवली येथे मिळते. नदीची लांबी सर्वसाधारणपणे ७२ कि.मी. असून पाणलोट क्षेत्र १४७.५० चौ. कि. मी. इतकी आहे. नदी पात्राची रुंदी उगमाजवळ १० मी. व संगामाजवळ ७५ मी. इतकी आहे. नदी पुर्नजीवन कार्यक्रमा अंतर्गत कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, रत्नागिरी मार्फत फोंडाघाट येथे ३ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.